Advertisement

सायन रुग्णालय परिसरात गॅसगळती

मुंबईतील सायन रुग्णालयाच्या परिसरात गॅस गळती झाल्याची घटना घडला.

सायन रुग्णालय परिसरात गॅसगळती
SHARES

मुंबईतील सायन रुग्णालयाच्या परिसरात गॅस गळती झाल्याची घटना घडला. गुरूवारी दुपारच्या सुमारास ही गॅस गळती झाली. लिफ्टच्या कामासाठी खड्डा खोदताना महानगर गॅस निगमच्या पाइपलाइनला धक्का लागून त्यामधून गॅसगळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या गळतीची माहिती मिळताच रूग्णालयातील सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ संबंधित एजन्सीला पाचारण केलं.

संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गॅस गळती थांबवली व होणार मोठा अनर्थ टळला. सायन रुग्णालयातील आरएमओ क्वार्टर्सच्या लिफ्टच्या आर्थिंगसाठी रुग्णालयाच्या गेट क्रमांक एकजवळ गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास काही कामगार खड्डा खोदत होतो. त्यामुळं जमिनीखालून गेलेल्या महानगर गॅस निगमच्या पाइपलाइनला धक्का लागला.

काम करणाऱ्या कामगारांनी याची माहिती कुणाला दिली नाही. दरम्यान, फुटलेल्या पाइपलाइनमधून गॅस बाहेर पसरू लागल्यानंतर काही सुरक्षारक्षकांना गॅसचा वास येऊ लागल्यानं त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुरक्षारक्षकांनी तात्काळ महानगर गॅस कंपनी, अग्निशमन दल, रूग्णालय देखभाल विभागाशी संपर्क करून माहिती दिली. महानगर गॅस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सावधानता बाळगत ती आधी जागा मोकळी केली. त्याठिकाणी गर्दी जमू न देता फुटलेल्या पाइपलाइनमधून होणारी गॅस गळती बंद केली. त्यामुळे पुढील धोका टळला. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा