Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात
SHARES

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू महिनाभरापूर्वी दुबईत झाल्यानंतर मुंबईत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. श्रीदेवी पद्मश्री पुरस्कार विजेत्या असल्यामुळे त्यांच्यावरील अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अादेशामुळे हे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाल्याची बाब पुढे अाली अाहे.


मुख्यमंत्र्यांना अधिकार

शासकीय इतमामात कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे, याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना अाहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. २२ जून २०१२ ते २६ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रात ४० व्यक्तींवर अशाप्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारनं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराद्वारे ही माहिती दिली अाहे.


असा झाला निर्णय

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याबाबत २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मौखिक निर्देश प्राप्त झाल्यानुसार २६ फेब्रुवारी २०१८ च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांस कळविण्यात आले.


श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात अाल्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात अाले, असे सांगितले जात होते. याची पुष्टी करण्यासाठी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवण्यात अाली. त्यात महत्त्वाची माहिती उघडकीस अाली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची नवीन माहिती समोर आली आहे.
- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते

हेही वाचा -

श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवीने लिहिलं इमोशनल लेटर

श्रीदेवीची जागा घेतली धकधक गर्लने!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा