Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

श्रीदेवीची जागा घेतली धकधक गर्लने!

श्रीदेवीच्या अकाली जाण्याने केवळ तिच्या कुटुंबावरच नाही, तर बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. श्रीदेवीची प्रमुख भुमिका असलेला मॉम हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. पण आता श्रीदेवीची जागा माधुरी दीक्षित घेणार आहे.

श्रीदेवीची जागा घेतली धकधक गर्लने!
SHARES

२४ फेब्रुवारीला सगळ्यांची लाडकी हवाहवाई म्हणजेच श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. ५४ वर्षीय श्रीदेवीच्या अकाली जाण्याने केवळ तिच्या कुटुंबावरच नाही, तर बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. श्रीदेवीची प्रमुख भुमिका असलेला मॉम हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. पण आता श्रीदेवीची जागा माधुरी दीक्षित घेणार आहे.


श्रीदेवी आज जिवंत असती, तर अभिषेक वर्मन याच्या अगामी चित्रपटात ती दिसली असती. पण आता तिची जागा बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित घेणार आहे. खुद्द श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने श्रीदेवी आणि माधुरीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत ही माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करताना त्याला साजेसं कॅप्शन जान्हवीने दिलं आहे. जान्हवी म्हणते, 'अभिषेक वर्मन यांचा आगामी चित्रपट आईच्या अगदी जवळचा होता. माधुरी यांनी हा चित्रपट स्विकारल्याबदद्ल बाबा, खुशी आणि मी माधुरी यांचे आभार मानतो'.


'मॉम' या चित्रपटानंतर श्रीदेवी 'झीरो' या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान, कैटरिना कैफ, आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हेही वाचा

आहाना प्रियांका गांधी यांच्या भुमिकेत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा