Advertisement

आहाना झाली प्रियांका गांधी!

'द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटात प्रियांका गांधींच्या या व्यक्तिरेखेसाठी आहानाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आहाना सध्या भलतीच आनंदात आहे. प्रियांका गांधी आणि आहानाच्या चेहरेपट्टीत साम्य असल्यामुळे तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

आहाना झाली प्रियांका गांधी!
SHARES

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आहाना कुमरा सध्या खूप आनंदात आहे. आहानाची एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. 'द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटात प्रियांका गांधींच्या या व्यक्तिरेखेसाठी आहानाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आहाना सध्या भलतीच आनंदात आहे. प्रियांका गांधी आणि आहानाच्या चेहरेपट्टीत साम्य असल्यामुळे तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.



 


या बातमीवर आहानानेच एका वृत्तपत्राला माहिती देत शिक्कामोर्तब केलंय. आहाना म्हणाली, 'मला द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटातील प्रियांका गांधींच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं. सध्या माझ्या लूकवर काम सुरू आहे. त्यानंतर चित्रीकरणाला सुरूवात होईल. मी ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या लूक वर जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सध्या ही माणसं हयात असून राजकारणात सक्रीय आहेत'.

 

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार, संजय बारू लिखित 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाद्वारेे विज रत्नाकर गुप्ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.



हेही वाचा

आपल्या अफेअर्सबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलली कंगना


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा