Advertisement

श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत दुबईहून नवा खुलासा


श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत दुबईहून नवा खुलासा
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाल्याचं निदान फॉरेन्सिक रिपोर्टमधून करण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्याबद्दल निर्माण झालेल्या तर्कवितर्कांवर किमान एक उत्तर मिळालं आहे. गल्फ न्यूज या दुबईतील प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे.


ह्रदयविकार की आणखी काही?

दुबईमध्ये मोहित मारवा या त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी श्रीदेवी गेल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री त्यांचा अकस्मिक मृत्यू झाल. यावेळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं वृत्त सगळीकडे पसरलं होतं. मात्र, फॉरेन्सिक रिपोर्टनंतर एक नवीन खुलासा समोर आला आहे.



श्रीदेवी पाय घसरून पडल्या?

हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना बाथटबमध्ये पडल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्या बाथटबमध्ये कशा पडल्या, यावर मात्र एकमत होत नाहीये. काही सूत्रांनुसार त्या कार्डिअॅक अरेस्टमुळे चक्कर येऊन बाथटबमध्ये पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. मात्र, काही सूत्रांनुसार त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आलाच नव्हता, तर अपघात झाल्यामुळे त्या घसरून बाथटबमध्ये पडल्या असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर, त्यांच्या शरीरात अल्कोहोलचे घटकही आढळून आले आहेत.


रात्री ११च्या सुमारास मुंबईत?

श्रीदेवी यांचं पार्थिव पुढील तपासासाठी आता दुबई पब्लिक प्रॉसिक्युशनच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. त्यानुसार आता पुढील तपास सुरु आहे. या सर्व प्रक्रियेसाठी अजून काही तास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रात्री ११च्या सुमारास अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

श्रीदेवी यांचा 'शिद्दत' चुकला, 'झिरो' ठरला शेवटचा चित्रपट

बिग बींना होती अघटिताची चाहूल?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा