Advertisement

मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण

मुंबईतल्या फेरीवाल्यांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याआधी २०१४ मध्ये असं सर्वेक्षण झालं होतं.

मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण
SHARES

मुंबईतल्या फेरीवाल्यांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ()uddhav thackeray यांनी दिले आहेत. याआधी २०१४ मध्ये असं सर्वेक्षण झालं होतं. मात्र या सर्वेक्षणात स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे नवीन सर्वेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल. (maharashtra cm uddhav thackeray directs to survey of hawkers in mumbai)

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची (hawkers) संख्या मोठी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांना परवाने देण्यासाठी महापालिकेने (bmc) २०१४ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. एकूण ९९,४३५ फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात केवळ १७५०० फेरीवाले पात्र ठरले होते.

यावेळच्या सर्वेक्षणात फेरीवाल्यांची वॉर्डनिहाय आकडेवारी आणि फेरीवाल्यांच्या व्यवसायांचं स्वरूप याबाबतची माहिती घेतली जाईल. या माहितीच्या आधारे फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून मदत करण्यासाठी योजना बनविण्यात येईल.

हेही वाचा- फेरीवाला क्षेत्राची यादी मिळणार पालिकेच्या संकेतस्थळावर

नवीन सर्वेक्षणात महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र तपासलं जाईल. संबंधित फेरीवाला स्वत: किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यामार्फतच व्यवसाय करेल, असं हमीपत्र घेतलं जाईल. अर्जदारास उपजीविकेचे अन्य कोणतेही साधन नसल्याचं हमीपत्र आणि फेरीवाला प्रमाणपत्र/परवाना कोणालाही भाड्याने देणार नाही किंवा हस्तांतरित करणार नाही, याचं हमीपत्रही घेण्यात येईल.

सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.

हेही वाचा- मुंबई महापालिका वाढवणार फेरीवाला शुल्क


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा