Advertisement

दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही लाॅकडाऊन?, मुख्यमंत्री २ दिवसांत घेणार निर्णय

दिल्लीतील लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारचं लक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागू करण्याबाबत येत्या २ दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही लाॅकडाऊन?, मुख्यमंत्री २ दिवसांत घेणार निर्णय
SHARES

दिल्लीत कोरोनाची परिस्थिती बिघडत चालल्याने तिथं नुकताच ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारचं लक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागू करण्याबाबत येत्या २ दिवसांत निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली. 

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १ मे पर्यंत लागू असेल. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक आणि आवश्यक सेवा सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. परंतु राज्यात कलम १४४ लागू असूनही या संचारबंदीच्या नियमांचं लोकांकडून पालन होताना दिसत नाही. बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होतानाच दिसत आहे. लोकं खासगी वाहनांनी रस्त्यावर येत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या संचारबंदीचा म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नसून दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे.

हेही वाचा- जाॅगिंग ट्रॅक, जीम खुली करण्याचा आग्रह!

त्यामुळे सुरूवातीला कडक निर्बंधांना विरोध करणारे व्यापारीच आता राज्यात कडक लाॅकडाऊन लावा, अशी मागणी करू लागले आहेत. कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेने सर्वांचाच अंदाज चुकवला आहे. ही लाट सौम्य असेल, असं वाटत असताना ती अतिशय तीव्र स्वरूपाची आली आहे. या लाटेला थोपवून सर्वसामान्यांचा जीव वाचवणं यालाच सरकारचं प्राधान्य राहील. सरकारकडून त्यासाठी आवश्यक आरोग्याच्या सोई-सुविधाही उभारल्या जात आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक उसळल्याने आधी विकेंड लाॅकडाऊन आणि आता कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. या लाॅकडाऊनवर सरकारची नजर असून तिथं लाॅकडाऊनचे नियम काय आहेत? वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यक सेवा यांना कशा प्रकारची मुभा देण्यात आली आहे, याची माहिती घेतली जात आहे. याबाबत योग्य ती दिशा ठरल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

(maharashtra cm uddhav thackeray might take decision on lockdown says vijay wadettiwar)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा