Advertisement

सेलिब्रिटींच्या वॕनिटी व्हॕन मुंबई पोलिसांच्या मदतीला

मुंबईतील अनेक वॅनिटी व्हॅन मालकांनी एकमतानं निर्णय घेत त्यांच्या वॅनिटी वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सेलिब्रिटींच्या वॕनिटी व्हॕन मुंबई पोलिसांच्या मदतीला
SHARES

कोरोनाविरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या पोलिस बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. सध्या उकाडा वाढला असून, पोलिसांना या उकाड्याचा त्रास सहन करत कर्तव्य बजावावं लागत आहे. पोलिसांची हीच अडचण लक्षात घेता सेलिब्रिटींच्या वॕनिटी व्हॕन मुंबई पोलिसांच्या मदतीला सेवेत रुजू झाल्या आहे. मुंबईतील अनेक वॅनिटी व्हॅन मालकांनी एकमतानं निर्णय घेत त्यांच्या वॅनिटी वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह राज्यावर कोरोनाचं सावट असून, या कोरोनानं मुंबईकरांचं संरक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. कोरोनामुळं मुंबई पोलिसांवर मोठा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक सेवांवर येत आहे. मुंबईसह राज्यातील कोरोनास्थिती नियंत्रित राहण्यासाठी शासनाकडून सतत नवनवीन कडक नियमावली, निर्बंध जाहीर करण्यात येत आहे. 

मुंबईच्या रस्त्यांवर संचारबंदीच्या नियमांमुळं अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. शिवाय अनेक ठिकाणी बॅरिगेट्टसही लावण्यात आले आहेत. परंतु हे नाकाबंदी, बॅरिगेट्सचे नियम मोडत अनेक नागरिक रस्त्यावर फिरतात त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांचा गस्त वाढवण्यात आला आहे. मात्र ही गस्त ठेवताना पोलिस बांधवांना उन्हातान्हापासून संरक्षण किंवा इतर सुविधा तात्काळ उपलब्ध होईल अशा जागा नाहीत. त्यामुळे १२ १२ तास गस्त ठेवणाऱ्या पोलिसांना काही काळ आराम, विश्रांती मिळावी यासाठी या वॅनिटी व्हॅन मुंबई पोलिसांना सेवा पुरवणार आहेत.

महामार्गासह अनेक ठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना काही क्षण विश्रांती, आराम देण्याबरोबरचं कपडे बदलणे आणि शौचालयाच्या सुविधा या वॅनिटी व्हॅनमध्ये आहेत. आत्तापर्यंत ४ वॅनिटी वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत.

आत्तापर्यंत दहिसर, मालाड, दिंडोशी, घाटकोपर या भागांमध्ये या वॅनिटी वॅन पोलिसांना सेवा देत आहेत. त्यामुळे सेलिब्रिंच्या आयुष्याचा भाग असलेल्या अलिशान वॅनिटी वॅन आता काही काळा पोलीसांना पुरवण्यास सज्ज झाल्या आहेत. मागील वर्षीही अनेक वॅनिटी वॅन मालकांनी आपल्या वॅनिटी वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत दाखल केल्या होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा