Advertisement

Shiv bhojan thali: शिवभोजन थाळीने भागवली ८८ लाखांहून अधिक जणांची भूक!

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या “शिवभोजन” थाळी योजनेअंतर्गत आतापर्यंत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचं वितरण झालं आहे.

Shiv bhojan thali: शिवभोजन थाळीने भागवली ८८ लाखांहून अधिक जणांची भूक!
SHARES

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या “शिवभोजन” थाळी योजनेअंतर्गत आतापर्यंत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचं वितरण झालं आहे. २६ जानेवारी २०२० या प्रजासत्ताक दिनापासून (maharashtra government distributed more than 88 lakh shiv bhojan thali from 26 january 2020 till date  ) शिवभोजन थाळी योजनेला सुरूवात करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात अवघ्या ५ रुपयांना मिळााऱ्या शिवभोजन थाळीने राज्यातील सर्वसामान्य नागरिक, स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना मोठा आधार दिला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवभोजन योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत राज्यभरात ८४८ केंद्र कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जून महिन्यात १८ जून पर्यंत १८ लाख ३९ हजार ४८६ अशा प्रकारे शिवभोजन थाळ्यांचं वितरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा - राज्यात मे महिन्यात 'एवढ्या' लाख लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ

लॉकडाऊनकाळात संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी या थाळीची किंमत ३ महिन्यांसाठी प्रति थाळी १० रुपयांवरुन कमी करत ५ रुपये अशी करण्यात आली. जेणेकरून कुणाचेही लाॅकडाऊनमध्ये जेवणाचे हाल होऊ नयेत. राज्यात काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसंच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. प्रचंड मोठ्या संख्येने शिवभोजन थाळीचा नागरिकांनी लाभ घेतला.

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त  उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्र चालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम ४५ तर ग्रामीण भागात ३० रुपये इतकी आहे.

शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

 हेही वाचा - शिवभोजन थाळीसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून 5 कोटींचा निधी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा