Advertisement

Mahajobs: बेरोजगारांची झुंबड, अवघ्या ४ तासांत ‘महाजॉब्स’वर ‘इतक्या’ जणांची नोंदणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अवघ्या ४ तासांतच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नाव नोंदणी केली.

Mahajobs: बेरोजगारांची झुंबड, अवघ्या ४ तासांत ‘महाजॉब्स’वर ‘इतक्या’ जणांची नोंदणी
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अवघ्या ४ तासांतच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नाव नोंदणी (maharashtra government mahajobs portal gets good response from job seekers and industrialist) केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवार ६ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चं (http://mahajobs.maharashtra.gov.in) उद्घाटन करण्यात आलं.

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाचं लोकार्पण होत नाही, तोच पहिल्याच ४ तासांतच संकेतस्थळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे.  http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होईल, असा दावा सरकारने केला आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. परंतु इच्छुकांना ही नोंदणी करताना स्थानिक वास्तव्याचं प्रमाणपत्र (डोमिसाईल) आवश्यक असेल. त्यामुळे या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना आपोआपच प्रधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा- तरूणांनो, नोकरी शोधताय? राज्य सरकारने बनवली ‘ही’ वेबसाईट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा