Advertisement

राज्यातील निर्बंध आणखी कठोर, काय बंद? काय सुरू?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिमसह अनेक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील निर्बंध आणखी कठोर, काय बंद? काय सुरू?
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रात अखेर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नवी नियमावली

  • रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. 
  • जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. 
  • खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. 
  • मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. 
  • मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. 
  • लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.
  • अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा