Advertisement

किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार! लवकरच येणार नवी गाइडलाईन

किराणा सामान विकत घेण्याच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या कारणामुळे होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी आता राज्य सरकारने किराणा दुकानांसाठी वेळ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.

किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार! लवकरच येणार नवी गाइडलाईन
SHARES

किराणा सामान विकत घेण्याच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या कारणामुळे होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी आता राज्य सरकारने किराणा दुकानांसाठी वेळ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान केवळ ४ तासच खुली राहणार आहेत. याबाबतची नवी गाइडलाईन लवकरच जारी होईल, असं म्हटलं जात आहे.

कोरोनासंदर्भातील (coronavirus) आढावा बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भूमिका मांडली आहे. सद्यस्थितीत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असली, तरी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेसोबतच आवश्यक सेवा देखील सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये औषधांची दुकाने, इतर वैद्यकीय सेवा, सार्वजनिक सेवेसोबतच, हाॅटेल-रेस्टाॅरंट, रस्त्यालगतचे खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, दुग्धजन्य-बेकरी पदार्थांची दुकाने सुरू ठेवण्यास आणि ती घेण्यासाठी बाहेर पडण्यास मुभा देण्यात आलेली आहे. 

हेही वाचा- मोठी बातमी! १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

परंतु या कारणाखाली उगीचच घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील दुकानांच्या वेळा ठरवण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर न ठेवता राज्य सरकारच्या गाइडलाईनमध्येच बदल करण्यात यावा, अशी भूमिका अजित पवार (ajit pawar) यांनी या बैठकीत मांडली. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर नवे नियम लागू करण्यात येतील, असं म्हटलं जात आहे.

दरम्यान याआधी मुंबईतील रस्त्यावर अनावश्यकरीत्या धावणाऱ्या वाहनांना अटकाव घालण्यासाठी कलर कोडची संकल्पना मुंबई पोलीस राबवत आहे. या संकल्पनेनुसार लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग वाहनांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. हे स्टिकर्स वाहनांना लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावर येणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

(maharashtra government to decide grocery shop timing to avoid rush in covid 19 pandemic)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा