Advertisement

मोठी बातमी! १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर या १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोठी बातमी! १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस
SHARES

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आवाका वाढवताना अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना ही लस घेता येणार आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एवढंच नव्हे, तर राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचे डोस विकत घेण्याची मुभा देखील देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या लाटेत देशातील कोरोना संक्रमणाची स्थिती अत्यंत बिकट होत असताना सरकारने जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर भर देण्याची मागणी देशभरातून होत होती. त्यातही प्रामुख्याने १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

राज्यांना थेट लस

अपुऱ्या लशीच्या पुरवठ्यामुळे कोरोना लसीकरण कार्यक्रमात सातत्याने खंड देखील पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारला लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची मुभा द्यावी, अशीसुद्धा एक मागणी होती. लशीच्या तुटवड्यावरून केंद्र विरूद्ध महाराष्ट्र असा संघर्षही जनतेने मागील काही दिवसांमध्ये अनुभवला आहे. ही मागणी देखील मान्य करत केली आहे. त्यानुसार एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लशीचा साठा सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला उर्वरीत ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्राने कंपन्यांना दिले आहेत. 

तिसऱ्या लशीला मंजुरी

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लस दिल्या जात आहेत. त्यातच रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. देशात सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येते. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात असून खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत. या दोन्ही निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला येत्या दिवसात वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशात मागील ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं असून वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारताचा समावेश झाल्याचं, आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. याआधी हाच टप्पा ९७ दिवसांत, तर चीनने १०८ दिवसांत गाठला होता.




हेही वाचा -

पश्चिम उपनगरातील 'हे' भाग ठरताहेत कोरोनाचा हॉटस्पॉट

  1. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा