Advertisement

आता १ किमीच्या आत दुसरं दारूचं दुकान नाहीच!


आता १ किमीच्या आत दुसरं दारूचं दुकान नाहीच!
SHARES

देशी आणि विदेशी दारूचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारने १ किलोमीटरची नवी अट घातली अाहे. त्यानुसार असा परवाना स्थलांतरीत करायचा असल्यास १ किमी अंतराच्या आत दुसरं दारूचं दुकान असल्यास संबंधित अर्जदाराचा परवाना स्थलांतरीत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने तशी अधिसूचना सोमवारी जारी केली आहे.


नियमामध्ये सुधारणा

राज्यात सुमारे २०० देशी-विदेशी मद्याच्या दुकानदारांनी परवाने स्थलांतरीत करण्याची परवानगी मागितली आहे. अशी परवानगी मागणारी अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने अनेक परवानाधारकांनी न्यायालयात या संदर्भात दाद देखील मागितली आहे. त्याकडे पाहता राज्य सरकारने या नियमात सुधारणा केली आहे. नवीन नियमांना महाराष्ट्र देशी विदेशी मद्य नियम (सुधारणा) २०१८ संबोधण्यात येईल. त्यानुसार देशी अथवा विदेशी मद्याचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी १ किमीची अट टाकण्यात आली आहे.


ग्रामीण भागातले परवाने शहरात

नव्या नियमांची अंमलबजावणी ३ ऑक्टोबर २०१८ पासून करण्यात येणार आहे. त्यानुसार १ किमीच्या आत देशी-विदेशी मद्याचं दुकान असल्यास अशा ठिकाणी परवाना स्थलांतरीत करता येणार नाही. ग्रामीण भागातील अनेक परवाने शहरी भागात स्थलांतरीत करण्यात यावेत, अशी अनेकांनी परवानगी मागितली असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजत आहे.


परवान्यांचा लिलाव

राज्यातील विविध जिल्ह्यातील देशी-विदेशी मद्द्यांचे परवाने नूतनीकरण न केल्याने बंद आहेत. अशा सुमारे २०१ मद्य परवान्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यानुसार अशा मद्द्याच्या दुकानांचा लिलाव करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात दुकान मंजूर आहे परंतु परवाना सुरू नाही, अशा परवान्याचा लिलाव संबंधित जिल्ह्यातच करण्यात येणार असल्याचं समजत आहे.हेही वाचा-

मुंबईत इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोल पुन्हा महागलं

आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement