Advertisement

राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध, 'या' सेवाच उपलब्ध

कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध, 'या' सेवाच उपलब्ध
SHARES

कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील.

परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. हे बदल २२ एप्रिल संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)

१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११

२) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११

३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११

४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११

५)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११

७) पशूखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११

८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी ७ ते ११

९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११

१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने- सकाळी ७ ते ११

११) लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार दंड

१२) लग्नात फक्त २५ लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये २ तास कार्यक्रम 

१३) आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी 

१४) मुंबईत खासगी गाडीत प्रवास ५० टक्के क्षमतेनं

१५) सरकारी कार्यालय १५ टक्के क्षमतेनं

१६) खासगी बसेस ५० टक्के क्षमतेनं

राज्य सरकारकडून गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज राज्यात ६७ हजार ४६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रुग्ण वाढ होण्याचे प्रमाण ६० हजारांच्या पुढे आहे. तर ५६८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात जास्त मृतांची संख्या आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा