Advertisement

लोडशेडिंगवर अखेर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार

वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून वीज खरेदीचे अनेक पर्याय शोधण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ज्यामुळे लोडशेडिंग टाळता येईल.

लोडशेडिंगवर अखेर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार
(Representational Image)
SHARES

लोडशेडिंग टाळण्यासाठी तसंच विजेचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड (CGPL) कडून अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिलं आहे.

राज्यात लोडशेडिंग होऊ नये आणि २४ तास वीज मिळावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय आला होता. राज्य मंत्रिमंडळानं वीज खरेदी करायला मान्यता दिली आहे. केंद्रांच्या दरापेक्षा कमी दरात मिळणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. 

खात्यांनुसार, विजेची मागणी लवकरच ३० हजार मेगावॅटपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. सध्या, पॉवर एक्स्चेंज रेट १२ प्रति युनिट आहे. उच्च दर विचारात घेऊन, CGPL ५.५० आणि ५.७ प्रति युनिट दरानं वीज देईल. ज्यामुळे राज्य संचालित महावितरणवरील आर्थिक भार कमी होईल.

महाराष्ट्र मंत्रिमंडळानं वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरणकडून वीज खरेदीचे अनेक पर्याय शोधण्यास मान्यता दिली ज्यामुळे लोडशेडिंग टाळता येईल.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या विशेष मंत्रिपरिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं ठरवल्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) चे संचालक मंडळ वीज खरेदी कराराच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेऊ शकेल,असा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.

महाराष्ट्रातील वीज निर्मिती आणि उपलब्धता स्थिती पूर्ववत होईपर्यंत महावितरणला १५ जून २०२२ पर्यंत अल्प कालावधीसाठी वीज खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

नितीन राऊत म्हणाले की, वीज वसुली करण्याच्या संदर्भात बचत गट नेमले होते. याची चौकशी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी गठीत केली आहे. राज्यात लोडशेडिंग होवू नये हा विषय कॅबिनेटमध्ये झाला. वीज मागणी वाढत असताना दुसरीकडं कोळसाचा साठा कमी येतोय. कधी कधी रेल्वेचे रॅक कोळशासाठी उपलब्ध होत नाहीत. कोयनेत १७ टीमसीच पाणी उपलब्ध आहे. वीज दहा ते बारा रूपयांना मिळते. पण आता बाजारात वीज मिळत नाहीय. गुजरातमध्ये आठवड्यातून एक दिवस वीज बंद केली आहे, असंही राऊतांनी सांगितलं.


हेही वाचा

मुंबईत टॅक्सी युनियनची किमान भाडे ३० पर्यंत वाढवण्याची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा