Advertisement

मुंबईत टॅक्सी युनियनची किमान भाडे ३० पर्यंत वाढवण्याची मागणी

नुकतीच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईत टॅक्सी युनियनची किमान भाडे ३० पर्यंत वाढवण्याची मागणी
SHARES

नुकतीच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतल्या टॅक्सी मेन्स युनियननं शहरातील किमान भाड्यात वाढ करावी, अशी मागणी केली आहे.

युनियननं किमान टॅक्सी भाडे २५ ते ३० रुपये वाढवण्याची मागणी केली आहे. जर टॅक्सी युनियनची ही मागणी मान्य केली तर सर्व सामान्यांना दरवाढीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

टॅक्सीच्या दरांची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार, सीएनजीच्या दरात २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्यास, टॅक्सीच्या भाड्यात कोणताही विलंब न करता वाढ करण्यात येऊ शकते.

CNG च्या किमतीत आता ७नं वाढ करण्यात आली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, शेवटच्या भाड्यात सुधारणा केल्यानंतर CNG ची किंमत ३५ टक्क्यांहून अधिक वाढवण्यात आली. मात्र, सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ करूनही टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्याची परिवहन विभागाचा विचार नाही, असं मुंबई टॅक्सीमन युनियनचे सरचिटणीस यांनी ‘मिड-डे’ला सांगितले.

त्यांनी पुढे सांगितलं की, कोविड-19-प्रेरित लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या गरीब टॅक्सी चालकांना सीएनजीच्या दरवाढीमुळे होणारे नुकसान परवडणारे नाही.



हेही वाचा

मुंबई ते गुजरात "या" ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू

विमानतळ टर्मिनल T2 ला T1 शी जोडण्यासाठी बेस्टची एसी बस सेवा सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा