Advertisement

दिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाला आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे

दिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाला आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार आता दिल्लीसह इतर ६ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य केली आहे.

केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, गुजरात आणि उत्तराखंड येथील रेल्वे प्रवाशांना आता महाराष्ट्रात येण्यासाठी प्रवास सुरू झाल्याच्या ४८ तासांच्या आत आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असेल तरच या प्रवाशांना राज्यात येता येणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला रेल्वे स्थानकांमधील सर्व एक्झिट पॉईंट्सवर थर्मल स्कॅनर उपलब्ध करून देण्याची आणि रेल्वे गाड्यांमध्ये कोरोना नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास सांगितलं आहे. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर फेस मास्क न घातल्यास ५००रुपये दंड आकारण्याची घोषणा याआधीच रेल्वेने केली आहे. 

राज्यात रविवारी कोरोनाचे ६८,६३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. नवीन रुग्ण आढळण्यास जगामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रने गेल्या चोवीस तासांत अमेरिका, ब्राझील आणि फ्रान्सलादेखील मागे टाकले आहे.




हेही वाचा -

पश्चिम उपनगरातील 'हे' भाग ठरताहेत कोरोनाचा हॉटस्पॉट

  1. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा