मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार

केंद्र सरकारने पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. या महिन्याच्या अखेरीस पडसलगीर निवृत्ते होत असल्याने पोलिस महासंचालकपदी सध्याचे पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. जर जैयस्वाल यांची वर्णी महासंचालकपदी झाली. तर मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी अनेक दिग्गज रांगेत आहेत. त्यामुळे आयुक्तपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

SHARE

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना शासनाकडून दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या मुदतवाढीला अॅड. आर. आर. त्रिपाठी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनंही पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. या महिन्याच्या अखेरीस पडसलगीर निवृत्त होत असल्यानं पोलिस महासंचालकपदी सध्याचे पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. जर जैयस्वाल यांची वर्णी महासंचालकपदी  लागली तर मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी अनेक दिग्गज रांगेत आहेत. त्यामुळे आयुक्तपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.


2 वर्षाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव


पडसलगीकर हे वयोमर्यादेनुसार ३१ ऑगस्ट २൦१८ रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यावेळी त्यांना 3 महिने मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३൦ नोव्हेंबर २൦१८ पर्यंत होती. ती मुदतवाढ पूर्ण होण्याआधी राज्य शासनानं अधिवेशन संपताच त्यांना पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचं परिपत्रक काढलं. तिसऱ्यांदा मुदतवाढीसाठी पडसलगीकर यांना 2 वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला.  


मुख्यमंत्री आग्रही?


पडसलगीकर यांना कायम ठेवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आग्रही असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. पडसलगीकर यांना मुदतवाढ मिळाली नसती. तर त्याजागी तात्कालीन मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती पक्की मानली जात होती.


मुदतवाढीला न्यायालयात आवाहन


राज्य शासनानं पडसलगीकर यांना दिलेली मुदतवाढ ही आक्षेपार्ह असून राज्य सरकार पक्षपातीपणा करत आहे. त्यामुळे अॅड. आर. आर. त्रिपाठी यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेत, या मुदतवाढीविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे केंद्रानं ही पडसलगीकर यांना मुदत वाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस पडसलगीकर निवृत्त झाल्यानंतर त्या जागी सध्याचे पोलिस आयुक्त सुबोधकुमार जैयस्वाल यांची वर्णी ही जवळपास निश्चित मानली जात आहे. या महत्वाच्या पदासाठी सध्या राज्याचे कायदा व सुव्यवस्था पदाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक संजय बर्वे, पुणे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम आणि ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नावांची  चर्चा आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या