Advertisement

सुरक्षा बलाचे जवान संपावर, पोलीस दलात सामावून घेण्याची मागणी


सुरक्षा बलाचे जवान संपावर, पोलीस दलात सामावून घेण्याची मागणी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील संवेदनशील अास्थापनांची सुरक्षा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी अचानक संप पुकारला. मंगळवार सकाळपासून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान ८ हजार जवान प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले असून त्यांच्या संपावर जाण्याने मुंबईतील ४० अास्थापनांसह महाराष्ट्रातील एकूण ९८ अास्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे राज्यात एकूण ८ डिव्हिजन असून या सगळ्यांनीच मंगळवार सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. भारत अगेंस्ट करप्शनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील या आंदोलनाचे नेतृत्व करत असून मंगळवारी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सगळे जवान पुण्याला जमणार आहेत. त्यानंतर तिथून हे सगळे जवान मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.


काय आहेत जवानांच्या मागण्या?

  • सर्व मसुब जवानांची कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करावी
  • सेवासमाप्ती केलेल्या जवानांना कोणतेही कारण न देता, विनाअट पुन्हा सेवेत घ्यावे
  • भरती प्रक्रिया पारदर्शक करुन जवानांना पोलीस दलाप्रमाणे प्रशिक्षण देण्यात यावे
  • सर्व जवानांना विनाअट राज्य पोलीस दलात सामावून घेणे
  • जवानांना रँक देवून राज्य पोलीस दलाप्रमाणे सोयीसुविधा, अधिकार द्यावे
  • जवानांना अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण द्यावे
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक पोलीस बल किंवा सुरक्षा बल असे नामकरण करावे
  • सेवेत असणाऱ्या मंत्रालयीन कर्मचारी यांच्या (पोलीस आयुक्तालये)प्रमाणे पारदर्शक कारभार चालवावा
  • राज्य पोलीसांप्रमाणे वेतन देण्यात यावे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा