Advertisement

दाटीवाटीच्या परिसरात गर्दी पांगवण्यासाठी SRPF ची मदत घेणार, राजेश टोपे


दाटीवाटीच्या परिसरात गर्दी पांगवण्यासाठी SRPF ची मदत घेणार, राजेश टोपे
SHARES
मुंबईच्या धारावी,कोळीवाडा सारख्या दाटीवाटीच्या परिसरात लाँकडाऊन अधिक प्रभावीपणे पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अशा ठिकाणी आता RPF पोलिस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंञी राजेश टोपे यांनी दिली. तसेच अशा भागात निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईचे लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत त्यांनी त्यांचे निरीक्षणे मांडली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने झाले पाहिजे. ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचे टोपेंनी सांगितले. 

गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. धारावीसारख्या दटीवाटीच्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये आहेत त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वच्छ करणे. तसेच मुंबईतील गर्दीच्या भागातील नागरिकांना शासनाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून  अन्न घरपोच  केले जाणार असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती टोपेंनी पञकारांना दिली.

 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा