Advertisement

पी उत्तर पालिका विभाग कार्यालयात ध्वजारोहण


पी उत्तर पालिका विभाग कार्यालयात ध्वजारोहण
SHARES

मालाड - मालाड पश्चिमेकडील लिबर्टी गार्डन येथील पी उत्तर पालिका विभाग कार्यालयात गुरुवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. या वेळी पी उत्तर विभागातील सर्व कर्मचारी वर्ग, सुरक्षारक्षक उपस्थित होते. सुरक्षारक्षकांनी या वेळी कवायत करून मानवंदना दिली. पी उत्तर पालिका विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाले यांनी उपस्थित सर्व कर्मचारी आणि नागरिकांना महापालिका निवडणुकीत ‘मी मतदान करणार आणि तुम्ही देखील मतदान करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या’ असं आवाहन या वेळी केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा