Advertisement

ठाणे: भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या

डोळा काढून रस्त्यावर खेळत होता माथेफिरु

ठाणे: भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या
SHARES

ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रामध्ये एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने कुत्र्याचा डोळा काढला आणि नंतर तो त्याच्यासोबत रस्त्यावर खेळत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. मुंब्रामधील रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्र्यावर या व्यक्तीने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपीने कुत्र्याचा डोळा काढला आणि तो सर्वांसमोर त्याच्यासोबत खेळत होता. हे पाहून स्थानिकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली.

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये आरोपी कुत्र्याच्या मृतदेहाशेजारी आरामात बसून डोळ्यासोबत खेळताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक पशु कल्याण गट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 325 नुसार, गंभीर दुखापत पोहोचवल्याच्या गुन्ह्याखाली तसेच, 'प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्या'च्या (Prevention of Cruelty to Animals Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

अग्निवीर जवानाच्या हातातून फुल लोडेड रायफल चोरीला

मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुले बेपत्ता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा