Advertisement

दहिसरच्या नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला


दहिसरच्या नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
SHARES

मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात दहिसरमध्ये राहणारा प्रतिक घाटले नावाचा तरुण नाल्यात पडून पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेला होता. मागील ५ दिवसांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याच्या शोधात होते. अखेर ५ दिवसांनी या तरुणाचा मृतदेह दहिसरच्या जयराज नगरजवळील नाल्यात सापडला. पोलिसांनी त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला आहे.



पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. त्यावेळी दहिसर पूर्वेकडील रावळपाडा परिसरात राहणारा प्रतिक घाटले आणि गौरव राजू हे दोघे मित्र नाल्यावरील पूल ओलांडत असतानाच हा पूल तुटला. प्रतिक आणि गौरव नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागल्यानंतर दोघांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत गौरवला बाहेर काढले, पण प्रतिक त्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर शनिवारी प्रतिकचा मृतदेह आढळला.

 


हेही वाचा - 

दहिसरमध्ये दोन तरुण नाल्यात गेले वाहून 

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा