Advertisement

मानखुर्द आगीमुळे ‘या’ मार्गांवर वाहतूक कोंडी

वाढत्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. याचाच परिणाम काही मार्गावर झाला आहे.

मानखुर्द आगीमुळे ‘या’ मार्गांवर वाहतूक कोंडी
SHARES

शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून मानखुर्द मंडाळा परिसरात लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. पण स्क्रॅपमुळे आग वाढत चाचली आहे. वाढत्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. याचाच परिणाम काही मार्गावर झाला आहे.

फ्री-वेवर घाटकोपरच्या दिशेनं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. इर्स्टन एक्स्प्रेस हायवे इथं छेडा नगर ते सायन इथं वाहतूक कोंडी झाली आहे. याशिवाय सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड वरील वाहतूकिवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे या मार्गानं प्रवास करण्याआधी विचार करा.

दरम्यान जवळपास ७ ते ८ तासापासून अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. पण आग आजूबाजूला पसरत आहे. धुराचे लोट देखील हवेत पसरत आहे. याशिवाय आग विझवताना १ अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी झाला आहे.

जिथं आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली केला आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.



हेही वाचा

मानखुर्दमधील आग अजून धुमसतेय, अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा