Advertisement

मानखुर्दमधील आग अजून धुमसतेय, अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी

जवळपास ७ ते ८ तासापासून अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

मानखुर्दमधील आग अजून धुमसतेय, अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी
SHARES

मानखुर्दमध्ये मंडाळा परिसरात दुपारी २ च्या सुमारास लागलेली ही आग अद्याप धुमसतेय. जवळपास ७ ते ८ तासापासून अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. पण आग आजूबाजूला पसरत आहे. धुराचे लोट देखील हवेत पसरत आहे. याशिवाय आग विझवताना १ अग्निशमन दलाचा अधिकारी जखमी झाला आहे.

जिथं आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली केला आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. मंडलाच्या मेन रोडच्या येथे एक स्क्रॅप आहे. याबाबत मी कलेक्टरकडेदेखील तक्रार केली आहे. 15 एकर जमीन ते अनधिकृतपणे वापरत आहेत. नकली तेल, नकली साबण बनवायचं काम तिथे होतं. दरवर्षी तिथे आग लागते. मी आठ वर्षांपासून विधानसभेत याबाबत तक्रार करत आहे. ही जागा मुंबईत आहे. आगीमुळे प्रदुषण होतं. चुकीचे काम रोखलं जावं. मी पर्यावरण आदित्य ठाकरे यांनादेखील याबाबत तक्रार केली. त्यांनी दखल घेतली नाही. आतादेखील आग लागली. दोन दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी लोक विसरुन जातील.”

 


हेही वाचा

मानखुर्दमध्ये गोदामाला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

शहरांतील घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा