Advertisement

मुंबईकरांनो चिकन खा, पण जरा जपून...


मुंबईकरांनो चिकन खा, पण जरा जपून...
SHARES

मांसाहार करणाऱ्यांसाठी चिकन म्हणजे जीव की प्राण... पण त्याच नाॅन-व्हेजेटरियन लोकांसाठी एक वाईट बातमी अाहे. कर्नाटकात बर्ड फ्लूनं डोकं वर काढलं अाहे. त्याचा धोका महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात अाला अाहे. त्यामुळेच चिकनवर ताव मारत असल्यास, जरा जपून...

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह मुंबईतही खबरदारी पाळली जात अाहे. मुंबई महापालिकेच्या अारोग्य खात्याकडूनही बर्ड फ्लूसंदर्भात सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात अाल्या अाहेत. बर्ड फ्लूविषयी लोकांमध्ये थोडीफार का होईना, पण जनजागृती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं महापालिकेच्या कार्यकारी अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं.


सुदैवाने मुंबईत अजूनही बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव झालेला नाही. तो होऊ नये, यासाठी अाम्ही संबंधित यंत्रणांना खबरदारीचा उपाय म्हणून सूचना केल्या अाहेत. जेणेकरून त्यानिमित्ताने लोकांमध्ये जनजागृती होईल.

- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी अधिकारी, महापालिका


काय आहे बर्ड फ्लू ?

एव्हिअन इन्फ्लुएन्झाच्या संसर्गामुळे पहिल्या टप्प्यात पक्ष्यांना फ्लूची लागण होते. कोंबड्याचा यात प्राधान्याने समावेश असतो. एच७एन९ आणि एच५एन१ या दोन प्रकारांमध्ये पक्ष्यांकडून मनुष्याला प्रादूर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. बर्ड फ्लूचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील सगळ्यांचा प्रादूर्भाव होत नाही.



अशी काळजी घ्या!

  • पक्ष्यांशी असणारा थेट संपर्क कमी करा
  • घरी पाळीव प्राणी असतील वा कुक्कुटपलानाचा व्यवसाय असेल तर दररोज स्वच्छता ठेवा
  • अर्धवट शिजलेले चिकन खाऊ नका
  • शिजलेले, कच्चे असे दोन्ही प्रकारचे मांस एकत्र फ्रिजमध्ये ठेवू नका
  • अंडी खूप दिवस साठवून ठेवू नका

हेही वाचा - 

मुंबईत कोंबड्यांचे स्वतंत्र पशुवधगृह


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा