Advertisement

धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर

अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबईत आता धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. लाॅकडाऊन असूनही अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबईत आता धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

वांद्रे परिसरात १८४ रुग्ण सापडले आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. तसंच अनेक नागरीक घराबाहेर फिरत असतात. त्यामुळे  वांद्र्यातील बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर आणि पत्थर नगरातील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. येथील रहिवाश्यांना लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी सूचनाही देण्यात येत आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.

एच/पूर्व विभागातील बेहराम पाडा, भारत नगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थर नगर परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.  हा संपूर्ण परिसर दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीने वेढलेला आहे. या परिसरातील लोकसंख्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून महापालिकेने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून येथील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, फेस मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी एच पूर्व विभागातील महानगरपालिकेचे अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात येत आहे. आजपासून पवित्र रमजानच्या उपवासा दरम्यान नागरिकानी घरात राहूनच कोरोना संकटाशी मुकाबला करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा -

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा