Advertisement

राज्यात मॅक्सीकॅब प्रवासी सेवा अधिकृत होणार?

मॅक्सीकॅब प्रवासी सेवा अधिकृत करण्याचा विचार परिवहन विभागाकडून होत आहे.

राज्यात मॅक्सीकॅब प्रवासी सेवा अधिकृत होणार?
SHARES

मॅक्सीकॅब प्रवासी सेवा अधिकृत करण्याचा विचार परिवहन विभागाकडून होत आहे. यासंदर्भात मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. मॅक्सीकॅबला परवानगी दिल्यास एसटीसह इतर सार्वजनिक परिवहन सेवांना फटका बसण्याची चिन्हं आहेत. एसटीबरोबरच राज्यातील अन्य परिवहन सेवा कायम तोट्यात राहिलेल्या आहेत. 

एसटीसारखी सेवा तोट्यात जाण्यास प्रमुख कारण म्हणजे मॅक्सीकॅब सेवा असून, या सेवेला परवानगी देण्यासाठी १९९९ पासून राज्य सरकारकडून प्रयत्न होत होते. २००१ मध्ये एसटी महामंडळानं मॅक्सीकॅबविरोधात संपही पुकारण्यात आला होता. त्या वेळी हा प्रस्ताव बासनात गुंडाळला होता. त्यानंतर राज्य सरकारनं एक समिती तयार केली. 

या कॅब सेवा एसटीसह अन्य सेवांना मारक ठरतील, असा अहवाल समितीनं दिला होता. त्यानंतर सरकारनं मंजुरी दिली नाही. परंतु, आता मॅक्सीकॅब आणण्यासाठी पुन्हा जोरदार हालचाली सुरू आहेत. काही कंपन्यांनी परिवहन विभागाकडेच यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मॅक्सीकॅब सेवेचे सध्याचे स्वरूप

  • मॅक्सीकॅब ही सात ते बारा आसनी प्रकारातील छोटय़ा आकारातील वाहने आहेत.
  • राज्यातील तालुका, ग्रामीण भागात ही वाहने अनधिकृतपणे धावतात.
  • अशा अनधिकृत वर दंडात्मक कारवाईही होते. 
  • आरटीओकडून परवाना दिला जात नाही.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा