Advertisement

नालेसफाईत कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा - महापौर


नालेसफाईत कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा - महापौर
SHARES

मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबेल, अशी भीती व्यक्त करणाऱ्या महापौरांनी महापालिकेकडून सुरु असलेले नालेसफाईचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. परंतु, या नालेसफाईच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून कामात कुचराई केली जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.



नाल्यांची पूर्ण सफाई झालेलीच नाही!

मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह महापालिकेतील नेत्यांनी केली. पूर्व उपनगरातील एमटीएनएल ब्रिज, बिकेसीतील मिठी नदी तसेच घाटकोपरमधील लक्ष्मीबाग नाला, भांडुपमधील उषा नगर नाला, बॉम्बे ऑक्सिजन नाला, बाऊंड्री नाला, मानखुर्द नाला, देवनार नाला आदी नाल्यांची पाहणी यावेळी करण्यात आली. यामध्ये काही नाल्यांची पूर्ण सफाई झाली नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.


प्रशासन-लोकप्रतिनिधी सोबत करणार काम

महापालिकेकडून नालेसफाईचे काम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला जात आहे. परंतु, काही ठराविक नाल्यांची सफाई न करता सूंपर्ण मुंबईतील नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच, काढलेला गाळ साचून न ठेवता तो गाळ ठरलेल्या ठिकाणी टाकण्यात यावा, अशीही सूचना केली. प्रशासन पूर्ण जोमाने मुंबईतील नालेसफाईची कामे करत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी तुंबून मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ही कामे वेळेत व योग्यरीत्या होण्यासाठी लोकप्रतिनिधी नालेसफाई कामांची पाहणी करून प्रशासनाला सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा

'मुंबईची तुंबई झाल्यास महापालिका प्रशासनच जबाबदार'


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा