Advertisement

पेंग्विननंतर आता राणीबागेत ३ डी थिएटर

राणीबागेला १५ हजार पर्यटक भेट देत असून सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३० हजारांवर जातो. असं असताना आता लवकरच हे दोन्ही आकडे आणखी फुगणार आहेत. कारण राणी बागेत लवकरच ३ डी थिएटर सुरू होणार आहे. मुंबई महानगर पालिका आणि अॅनिमल प्लॅनेट यांनी एकत्र येत राणी बागेत ३ डी थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे ३ डी थिएटर १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पेंग्विननंतर आता राणीबागेत ३ डी थिएटर
SHARES

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बागेतील प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. याच मुख्य कारण म्हणजे राणीबागेत परदेशी आणि नवीन पाहुण्यांच अर्थात पेंग्विनचं आगमन. राणी बागेत पेंग्विन दाखल झाल्यानंतर राणी बागेकडे येण्याकडे पर्यटक आणि मुंबईकरांचा कल वाढला आहे. त्यामुळेच दररोज राणीबागेला १५ हजार पर्यटक भेट देत असून सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३० हजारांवर जातो. असं असताना आता लवकरच हे दोन्ही आकडे आणखी फुगणार आहेत. कारण राणी बागेत लवकरच ३ डी थिएटर सुरू होणार आहे. मुंबई महानगर पालिका आणि अॅनिमल प्लॅनेट यांनी एकत्र येत राणी बागेत ३ डी थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे ३ डी थिएटर १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.


३ डी थिएटरमध्ये २ डी मुव्ही-शो

राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांना त्यातही शालेय विद्यार्थ्यांन वन्यप्राणी आणि पर्यावरणविषयक माहिती मिळावी या उद्देशानं हे ३ डी थिएटर सुरू करण्यात येणार आहे. पण पर्यटकांनो हे ३ डी थिएयटर १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असलं तरी या ३ डी शो पाहण्यासाठी तुम्हाला किमान दीड महिना थांबावं लागेल. कारण अॅनिमल प्लॅनिटकडून अद्याप ३ डी मुव्हीज राणी बागेला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या दीड महिना तर ३ डी थिएटरमध्ये २ डी मुव्ही-शोच पर्यटकांना पाहावे लागणार आहेत.


३ डी थिएटर असणारं पहिल प्राणीसंग्रहालय

राणीच्या बागेत सुरू होणाऱ्या थिएटरमध्ये चार शो दाखवण्यात येणार असून यात एकावेळी २०० पर्यटकांना हा शो पाहता येणार आहे. सकाळी ११ ते १२, दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २.३० ते ३.३० आणि संध्याकाळी ४ ते ५ या कालावधीत हा शो दाखवण्यात येणार आहे. हा शो पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात येणार आहे. मात्र, इतरांसाठी आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयात ३ डी प्रणाली कार्यरत करण्यात आली असली तरी देखील सद्यस्थितीत यात २ डी शो दाखवण्यात येणार आहे. परंतु राणीबाग प्राणीसंग्रहालय संपूर्ण देशभरात ३ डी सुविधा देणारे हे पहिले प्राणीसंग्रहालय ठरलं आहे.


थिएटरमध्ये सात चित्रफिती दाखवणार

या ३ डी थिएटरमध्ये अॅनिमल प्लानेटनं दिलेल्या २ डी प्रणालीच्या jawai – indias leopard hills, african wild, mysterious wilds of india, extinct or alive आणि speed of life हे सात चित्रफिती दाखवण्यात येणार आहे. त्याशिवाय डिस्कवरी चॅनलकडून पालिका प्रशासनाला आणखी सात चित्रफिती देण्यात आल्या आहेत.


पेंग्विनला पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा

दोन वर्षांपूर्वी परदेशातून मुंबईतील राणीबागेत आठ पेंग्विन आणण्यात आले. साधारण दोन फुटांपर्यंतची उंची असणारे, दुडक्या चालीने लक्ष वेधून घेणारे, पाण्यात सूर मारणाऱ्या या पेंग्विनला पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची रांग लागू लागली. राणीबागेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार हालचाली करण्यात येत असून लवकर राणीबागेत पांढरा सिंह, लांडगे, कोल्हे, पानघोडे असे प्राणी आणण्यात येणार आहेत. दरम्यानं नुकतचं सुरू करण्यात आलेलं ३ डी थिएटर याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा -

लोकार्पणानंतर अवघ्या दोन दिवसांत फ्लोरा फाऊंटन बंद

रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान महोत्सवाचं आयोजन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा