Advertisement

रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान महोत्सवाचं आयोजन


रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान महोत्सवाचं आयोजन
SHARES

भौतिकशास्त्र हा विषय सर्वांच्याच पचनी पडतो असं नाही. काहींसाठी तर तो डोकेदुखी ठरणारा असतो. परंतु भौतिकशास्त्राच्या किचकट सिद्धांतांचे बारकावे हसत खेळत शिकता यावेत, यासाठी माटुंगा इथल्या डीजीरुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

खगोलशास्त्र संकल्पनेवर आधारित

रुपारेल कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय विब्ग्योर या विज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. १ आणि २ फेब्रुवारी असे दोन दिवस हा महोत्सव भरणार असून हे या महोत्सवाचं सातवं वर्ष आहे. भौतिकशास्त्रातील नियम तसंच सूर्य, पृथ्वी, तारे, सूर्यमाला, ग्रह, मानवी उपग्रह यांसारख्या अवकाशातील विविध गोष्टींचा मेळ विब्ग्योरमध्ये पाहायला मिळणार आहे. माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं या घटनेला यावर्षी ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त विब्ग्योर हा महोत्सव खगोलशास्त्र या संकल्पनेवर आधारित असेल.

विनामुल्य प्रवेश

या महोत्सवात खगोलशास्त्राशी संबंधित व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात आयआयटी मुंबईचे डॉ. अभय देशपांडे, नेहरु सायन्स सेंटरचे संचालक डॉ. अरविंग परांजपे, विल्सन कॉलेजचे प्राध्यापक महेश शेट्टी आदी नामवंत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा आणि पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामुल्य असणार आहे.हेही वाचा

दहावीचं हॉल तिकीट आता ऑनलाइन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा