Advertisement

दहावीचं हॉल तिकीट आता ऑनलाइन

दहावीच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदापासून अर्थात मार्च २०१९ ला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन हाॅल तिकीट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दहावीचं हॉल तिकीट आता ऑनलाइन
SHARES

दहावीच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदापासून अर्थात मार्च २०१९ ला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन हाॅल तिकीट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारपासून सर्व शाळांमध्ये ऑनलाइन हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे हॉल तिकीट हरवल्यास विद्यार्थ्यांना तातडीने दूसरी प्रत मिळणार आहे. या निर्णयामुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


असं मिळवा आॅनलाईन हॉलतिकीट

आॅनलाईन हाॅल तिकीट मिळण्यासाठी www.mahasscboard.in किंवा www.mahasscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्कूल लॉग इनमधून हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. आॅनलाईन हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर या हॉल तिकीटच्या प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही, शिक्का घेणं आवश्यक असणार आहे. त्यशिवय ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकिटाची प्रिंट देताना कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क घेऊ नये अशी सूचना शिक्षण मंडळाने दिली आहे. त्यशिवय हॉल तिकिटावरील विद्यार्थ्याचा फोटो, सही, नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भात काही दुरुस्त्या असल्यास शाळांनी स्वतःच्या स्तरावर दुरुस्ती करून त्याची एक प्रिंट विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवावी लागेल. तसंच विषय आणि माध्यम बदल असेल तर ती दुरुस्ती माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करावी लागेल. तर इतर काही तांत्रिक अडचण असल्यास शाळांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केलं आहे.


हॉल तिकीट हरविल्यास दुसरी प्रत मिळणार

दहावीच्या परीक्षेसाठी हाॅल तिकीट अत्यंत महत्त्वाचं असतं. हाॅल तिकीटशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे हाॅल तिकीट सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. अशात हाॅल तिकीट हरवलं तर विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसतो, तर नव्यानं हाॅल तिकीट मिळवणं ही मोठी डोकेदुखी असते. आता मात्र हाॅल तिकीट हरवलं तरी विद्यार्थ्यांना टेन्शन येणार नाही. कारण हाॅल तिकीट हरवल्यास शाळेकडून त्वरीत दुसरी प्रिंट आऊट काढून मिळणार आहे. या प्रिंटवर द्वितीय प्रत अर्थात डुप्लिकेट असा उल्लेख करत त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवत शाळेच्या शिक्क्यासह मुख्यापकांची सही घ्यावी लागेल.



हेही वाचा

मोदी गुरूजींची शाळा! परीक्षेच्या पलिकडेही खूप मोठं जग आहे, मोदींचा विद्यार्थ्यांना धडा

शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त ?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा