Advertisement

मोदी गुरूजींची शाळा! परीक्षेच्या पलिकडेही खूप मोठं जग आहे, मोदींचा विद्यार्थ्यांना धडा

परीक्षेपलिकडेही खूप मोठं जग आहे असा धडा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिला आहे. परीक्षेत यश न मिळाल्यानं खचून जाऊ नका तर पुन्हा नव्या जोमानं उभं रहा कारण परीक्षा म्हणजेच सर्व काही नाही, या पलिकडेही खूप मोठ जग आहे.

मोदी गुरूजींची शाळा! परीक्षेच्या पलिकडेही खूप मोठं जग आहे, मोदींचा विद्यार्थ्यांना धडा
SHARES

दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे करिअरचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा टप्पा जो कुणी यशस्वीरित्या पार करतो तोच तरतो असा साधारणत: समज आहे. याच समजामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांना विशेष महत्त्व असल्यानं नेहमीच विद्यार्थ्यांच्या डोक्यावर दहावी-बारावीच्या परीक्षांचं ओझं असतं. त्यातूनच या परीक्षांमध्ये अपयश मिळाल्यास काहीजण खचून जातात तर काहीजण आत्महत्यापर्यंतही पोहचतात. हीच गंभीर बाब लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेपलिकडेही खूप मोठं जग आहे असा धडा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिला आहे. परीक्षेत यश न मिळाल्यानं खचून जाऊ नका तर पुन्हा नव्या जोमानं उभं रहा कारण परीक्षा म्हणजेच सर्व काही नाही, या पलिकडेही खूप मोठ जग आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेपेक्षाही जीवनाची परीक्षा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे या परीक्षेत यशस्वी व्हा असं म्हणत मोदींनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना कानमंत्र दिला आहे.



विद्यार्थी व पालकांशी 'परीक्षा पे चर्चा '

मन की बात आणि चाय पे चर्चामधून मोदी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं जनतेशी संवाद साधत आहेत. त्या पुढे जात गेल्या वर्षी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा पे चर्चा सुरू केली. परीक्षा पे चर्चा या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी मंगळवारी संवाद साधला. सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील झालेल्या या परीक्षा पे चर्चा कार्यक्रम मुंबईसह देशभर शाळांमधून टिव्ही, इंटरनेट, रेडिओ या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आला. दरम्यान नवी दिल्लीत जिथं मोदी गुरूजींनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची शाळा घेतली त्या ठिकाणी अर्थात कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्रातून १०६ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांनी तब्बल १ तास २८ मिनिटं संवाद साधला.


इतर भाषांमध्येही करिअरच्या विविध संधी 

सहावीपासूनच्या विद्यार्थ्यांशी मोदींनी यावेळी संवाद साधला असला तरी हा संवाद विशेष करून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच होता. दहावी-बारावीच्या परीक्षांचं ओझं लक्षात घेत हे ओझं कमी करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजेच सर्व काही नसून त्या पलिकडेही मोठं जग आहे. त्यामुळे या परीक्षेतील अपयशामुळे खचून जाऊ नका. विद्यार्थ्यांना नव्यानं उभं करा, विद्यार्थ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा असा सल्ला मोदींनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला. तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान विषय महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत. परंतु या विषयांव्यतिरिक्त इतरही विषयांना वेळ द्या. इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषाही महत्त्वाच्या असतात, त्यामध्येही करिअरच्या विविध संधी असतात. त्यामुळे विद्यार्थी देशपासून विविध भाषा आत्मसात करण्यालाही प्राधान्य द्या असंही मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं.


सध्या तंत्रज्ञानानंही बरीच प्रगती केली असून पालकांनी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. त्यांना विविध अॅप, गुगल, यासंह विविध तंत्रज्ञानाचा माहिती जमा करण्यासाठी वापर कसा करावा हे सांगावे. विशेष म्हणजे आपला पाल्य कसा ही असेल तरीही पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिली. मुलांच्या चुका प्रेमान सुधारण्यावरही पालकांचा भर असला पाहिजे अस मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.



हेही वाचा -

छोटा भीम गेमद्वारे देणार स्वच्छतेचे धडे

भुज एक्सप्रेसमधील महिलेची हत्या केली तरी कुणी? अटक करण्यात आलेला आरोपी निर्दोष!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा