Advertisement

छोटा भीम गेमद्वारे देणार स्वच्छतेचे धडे


छोटा भीम गेमद्वारे देणार स्वच्छतेचे धडे
SHARES

युक्ती आणि शक्तीनं शत्रूंना धडा शिकवणारा छोटा भीम लहान मुलांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. लहानग्यांचा हाच आवडता छोटा भीम आता आपल्याला स्वच्छतेचे धडे देणार आहे आणि तेही एका मोबाईल गेमच्या माध्यमातून. स्वच्छ भारत मिशन या केंद्राच्या योजनेतून प्रेरित होत गेमिंग क्षेत्रातील एका कंपनीनं छोटा भीम स्वच्छ भारत रन गेम तयार केला आहे. याच छोटा भीम रन गेममधून छोटा भीम लहानग्यांपासून सर्वांनाच स्वच्छतेचं महत्त्व सांगताना दिसणार आहे.


स्वच्छतेची बीज रोवण्यासाठी छोटा भीम 


स्वच्छ भारतची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन देशभर सुरू केलं आहे. या मिशनच्या माध्यमातून देशभर स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. ही योजना अनेक ठिकाणी प्रभावीपणे राबवली जात असून स्वच्छतेबाबत जनजागृतीही चांगल्याप्रकारे होताना दिसत आहे. याच केंद्राच्या स्वच्छ भारत मिशनने प्रेरित होत गेमिंग क्षेत्रातील नामांकित नझारा कंपनीनं छोटा भीम रन गेम आणला आहे. लहान मुलं ही देशाचं भवितव्य आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये जितक्या चांगल्या सवयी, गोष्टी रुजवल्या जातील तितकं ते त्यांच्या आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं हिताचं असेल असं म्हणत नझार कंपनीनं लहानग्यांमध्ये स्वच्छतेची बीज रोवण्यासाठी छोटा भीम रन गेमही अनोखी शक्कल शोधून काढली आहे.



मुलांना चांगली गोष्ट शिकवता येणार असल्याचं समाधान


छोटा भीम या कार्टून पात्राची लहान मुलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच कंपनीनं याच पात्राची निवड करत गेम तयार केला आहे. या गेमच्या माध्यमातून छोटा भीम लहानग्यांना स्वच्छ भारत मिशनचे धडे देणार आहे. दरम्यान या गेमच्या माध्यमातून मुलांना एक चांगली गोष्ट शिकवता येणार असल्याचं समाधान आम्हाला आहे. आम्हाला विश्वास आहे की, या गेमपासून प्रेरीत होऊन लहान मुलं आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावतील. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया नझाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष अग्रवाल यांनी दिली आहे.


असा असेल गेम


गेममध्ये अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. या गेममध्ये मुंबई, जयपूर आणि दिल्ली या शहरांमध्ये स्वच्छता अभियाचा प्रचार करण्यासाठी एका रनचं आयोजन करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या शहरात छोटा भीमला मिशन पूर्ण करण्यासाठी मदत करणं हा टास्क असणार आहे. हा गेम खेळणाऱ्याला प्रत्येक टास्क पूर्ण करायचे आहेत. गेममध्ये स्वच्छ भारतचे मिशन पूर्ण करताना तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. याच अडथळ्यांवर मात करत तुम्हाला गेम पूर्ण करावा लागेल. गुगल प्ले स्टोअरमधून तुम्हाला हा गेम डाऊनलोड करता येऊ शकतो.


हेही वाचा -

डॉ. अजय देशमुख विद्यापीठाचे नवे कुलसचिव

आणखी दोन संशयित दहशतवादी एसटीएसच्या जाळ्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा