Advertisement

डॉ. अजय देशमुख विद्यापीठाचे नवे कुलसचिव


डॉ. अजय देशमुख विद्यापीठाचे नवे कुलसचिव
SHARES

डॉ. अजय देशमुख यांनी गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारला. याआधीचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. सुनिल भिरूड यांनी नवनियुक्त कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्याकडे कुलसचिवपदाचा कार्यभार सोपवला


अमरावती विद्यापीठात कुलसचिव पदावर कार्यरत 

डॉ. अजय देशमुख हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्याशिवाय ते संचालक महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते. डॉ. अजय देशमुख यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण एम. . इंग्रजी या विषयात केले असून पीएचडीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

राज्यपालांकडून क्लीन चिट

काही दिवसांपूर्वी डॉ. देशमुख हे वादग्रस्त आणि गैरवर्तणूक करणारे असल्यानं त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना दिलं होतं. परंतु देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आल्यानं अखेर मुबंई विद्यापीठाचा कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला

देशातील अग्रगण्य आणि गौरवशाली परंपरा असलेल्या विद्यापीठातील कुलसचिव पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. पूर्वानुभवाच्या आधारावर प्रशासनात अधिक चांगलं योगदान देता येईल, असं मत नवनियुक्त कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी व्यक्त केलं.


हेही वाचा

शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त ?

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती वादात?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा