Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती वादात?

विद्यापीठाच्या कुलसचिव पदी वादग्रस्त आणि अनेक आरोपांचा ठपका असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आल्याचं म्हणत या नियुक्तीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आक्षेप घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती वादात?
SHARES

मुंबई विद्यापीठ आणि वाद हे आता समीकरणचं झालं आहे. त्यानुसार आता मुंबई विद्यापीठाच्या वादात आणखी एका वादाची भर पडली आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव पदी वादग्रस्त आणि अनेक आरोपांचा ठपका असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आल्याचं म्हणत या नियुक्तीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आक्षेप घेतला आहे. ही नियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी मनविसेचे अध्यक्ष अॅड. संतोष धोत्रे यांनी एका पत्राद्वारे थेट राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे केली आहे.


नियुक्तीच वादात

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील महत्त्वाची पद रिक्त असल्यानं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यासाठी विद्यापीठाकडून विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार झालेल्या मुलाखतीत संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अजय देशमुख यांची नियुत्की मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी २१ जानेवारीला देशमुख पदभार स्वीकारणार होते. पण पदभार स्वीकारण्याआधीचं त्यांची नियुक्ती वादात अडकली आहे. दरम्यान दुपारी उशीरापर्यंत तरी देशमुख यांनी पदभार स्वीकारला नव्हता.


नियुक्ती रद्द करा

मनविसेच्या म्हणण्यानुसार, डॉ. अजय देखमुख हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलसचिव म्हणून कार्यरत होते. यावेळी देशमुख यांनी स्वत:च्या एमए च्या गुणपत्रिकेत फेरफार करून ५५ टक्क्यांपर्यंत गुण वाढवले आहेत. त्याशिवाय अमरावती विद्यापीठात त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती केली असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वादग्रस्त आणि ठपका असलेल्या व्यक्तीची विद्यापीठाच्या कुलसचिवपदी करण्यात आलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मनविसेची मागणी आहे. राज्यपालांसह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुहास पेडणेकर यांच्याकडेही मनविसेनं पत्राद्वारे ही मागणी केली आहे. तेव्हा राज्यपाल आणि कुलगुरू आता यावर काय निर्णय घेतात याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा -

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

११ वर्षीय मुलावर तब्बल ३० शस्त्रक्रिया



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा