Advertisement

११ वर्षीय मुलावर तब्बल ३० शस्त्रक्रिया

लहान मुलाला जरासं खरचटलं तरी आपलं काळीज भरून येतं; परंतु साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलावर या वयात तब्बल ३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

११ वर्षीय मुलावर तब्बल ३० शस्त्रक्रिया
SHARES

लहान मुलाला जरासं खरचटलं तरी आपलं काळीज भरून येतं; परंतु साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलावर या वयात तब्बल ३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियांना हा मुलगा अगदी हसत खेळत सामोरा गेल्यानं सध्या कोहिनूर रूग्णायलात तो चर्चेचा विषय बनला आहे. फरहान अहमद चौधरी असं या ११ वर्षीय मुलाचं नाव असून, त्याला ‘ज्युवेनाईल रीकरंट रेस्पिरेटरी पापिलोमेटोडीस’ हा दुर्मीळ आजार झाला आहे. 


नेमका आजार काय?

ज्युवेनाईल रीकरंट रेस्पिरेटरी पापिलोमेटोडीस हा अत्यंत दुर्मीळ आजार आहे. या आजारात साधारणपणे ३ ते ४ महिन्याच्या अंतराने रूग्णाच्या श्वसनमार्गात पुन: पुन्हा गाठ तयार होते. ही गाठ तयार झाल्यानंतर की काढून टाकणं हा एकमेव उपाय असतो. हा आजार दहा हजारांतील एका व्यक्तीला होत असून, यावर ठोस उपचार उपलब्ध नाहीत. 


अशी केली जाते शस्त्रक्रिया

फरहानाला झालेला हा आजार अत्यंत गंभीर असून, त्यावर करावी लागणारी शस्त्रक्रिया त्याहीपेक्षा आव्हानात्मक आहे. त्याच्या शरीरातील गाठ श्वसन नलिकेतच असल्यानं त्याला ३ मिनिटे कृत्रिम श्वास दिला जातो आणि पुढची ३ मिनिटं शस्त्रक्रिया केली जाते. पुन्हा ३ मिनिटं श्वास, त्यानंतर ३ मिनिटं पुढची शस्त्रक्रिया याप्रकारे एकूण अर्धा ते पाऊण तास एका शस्त्रक्रियेसाठी लागतो. ३-३ मिनिटांच्या ग्रीन विंडो काळातच ही शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचं कोहिनूर रूग्णालयातील तज्ज्ञ डॉ. संजय हेलाल यांनी सांगितलं. त्याशिवाय या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागते. डॉ. सईदा खान आणि डॉ. रत्नाकर गोसावी या कुशल भूलतज्ज्ञांच्या सोबतीमुळेच ही शस्त्रक्रिया उत्तमरित्या पार पाडण्यात कोहिनूरला यश आलं आहे. विशेष म्हणजे अवघा दीड वर्षाचा असताना त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया पार पडली होती; परंतु भविष्यात अजून किती वेळा फरहानवर ही शस्त्रक्रिया करावी लागेल याबाबत काहीही सांगता येत नाही. 



हेही वाचा -

छोटा पेंग्विन खुश म्हणत निलेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

पोलिसांची डोकेदुखी वाढणार? आॅर्केस्ट्राचंही आता डान्स बारमध्ये रूपांतर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा