छोटा पेंग्विन खुश म्हणत निलेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे कुटुंबियांवर आणि शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नुकतीच निलेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

SHARE

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे कुटुंबियांवर आणि शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नुकतीच निलेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. तर आता युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे निलेश राणे यांनी आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईत नाईट लाइफ सुरू व्हावी अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी सातत्यानं उचलून धरली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा डान्स बार सुरू होणार असल्यानं आदित्य ठाकरे यांच्या या मागणीशी याचा संबंध जोडताना आदित्य ठाकरेची चांगलीच खिल्ली उडवली आहे. छोटा पेंग्विन खुश असेल असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.


निलेश राणेंचं ट्विट

डान्स बारसंबंधी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर रात्री उशीरा निलेश राणेंनी ट्विट केलं आहे. डान्स बार सुरू झाल्यामुळे आदित्य ठाकरे खुश असतील. कारण त्यांनी नाईट लाइफची मागणी केली होती. ही मागणी देवाकडे मनापासून केली होती. त्यामुळेच डान्स बार सुरू झाले असून त्यांची मागणी मान्य झाल्याने ते खुश असतील असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी आदित्य ठाकरेंचा उल्लेख त्यांनी छोटा पेंग्विन असा केला आहे.


शिवसेनेवर सातत्यानं टीका

निलेश राणेंच नव्हे तर नितेश राणेही सातत्याने ठाकरे कुटुंबियांवर टीकेचा बाण सोडताना दिसत आहेत. बायको असावी तर शिवसेनेसारखी, कितीही लफडी समजली तरी सोडत नाही असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली होती. तर बाळासाहेबांवर गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेकडून झालेल्या टीकेला उत्तर देतानाही नितेश राणे यांनी भावाची बाजू सावरत अंगावर आल्यास शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेला दिला होता. आता थेट आदित्य ठाकरे यांची छोटा पेंग्विन म्हणून खिल्ली उडवत निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.हेही वाचा -

मंत्रालयातील आत्महत्येच्या प्रयत्नांचा सिलसिला थांबेना

गिरीश बापटांना न्यायालयाचा दणका, मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचे ताशेरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या