Advertisement

शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त ?

आचारसंहिता लागू होण्याआधी अर्थात फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. याअनुषंगाने ३ फेब्रुवारी रोजी शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त ?
SHARES

गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अऩेक पदं रिक्त आहेत. तर अनेक विद्यापीठात तसंच महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वांवर शिक्षकांची भरती केली जाते. पूर्णवेळ शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक भरती करण्याची मागणी केल्या कित्येक वर्षांपासून होत होती. त्यानुसार अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. सरकारन शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला असून ही भरती आता शक्य तितक्या लवकर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानुसार आचारसंहिता लागू होण्याआधी अर्थात फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. याअनुषंगाने ३ फेब्रुवारी रोजी शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शिक्षक भरतीसाठी याआधीही तावडे यांच्याकडून अनेक तारखा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी तरी शिक्षक भरती होणार का याकडे आता उमेदवारांचं आणि विद्यार्थ्याचं लक्ष लागलं आहे.


आचारसंहिता अगोदर शिक्षक भरती

रखडलेली शिक्षक भरती मार्गी लावण्याचा निर्णय याआधी राज्य सरकारनं जाहिर केला. पण प्रत्यक्षात काही शिक्षक भरतीची प्रक्रिया काही सुरू झालेली नाही. आता मात्र सरकारकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहुर्त सरकारनं शोधला असून त्यातही ३ फेब्रुवारी ही जाहिरातीसाठीची तारीख असल्याचं समजतं आहे. तर सरकारकडून शिक्षक भरतीच्या कामाला सुरूवात झाल्याचीही माहिती आहे. व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे शिक्षण आयुक्तांकडून प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकार्यांना भरतीविषयक माहिती कळवण्यात आल्याचंही समजतं आहे.


३ फेब्रुवारीला शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

भरतीच्या पहिल्या टप्प्यात १८ हजार पदं भरण्यात येणार आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकरच अर्ज दुरूस्तीला सुरूवात होणार असून ३० जानेवारीला पवित्र पोर्टल अपलोड करण्यात येणार आहे. तर ३ फेब्रुवारीला शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया पूर्ण करत १८ हजार पदं निवडणुकीपर्यंत भरली जाणार असल्याचा दावा तावडेंनी केला आहे.



हेही वाचा -

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

मध्य रेल्वेच्या 'राजधानी'ची कमाल, १३ मिनीटे अगोदरचं मुंबईत दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा