मध्य रेल्वेच्या 'राजधानी'ची कमाल, १३ मिनीटे अगोदरचं मुंबईत दाखल

दिल्लीवरून मुंबईला मध्य रेल्वे मार्गावरून सुटलेली पहिली नवी कोरी एक्सप्रेस सोमवारी चक्क १३ मिनिटं लवकर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात दाखल झाली आहे.

SHARE

लांब पल्ल्याची कोणतीही एक्सप्रेस वेळेत येईल याची काही खात्री नसते. एक्सप्रेसला उशीर होतो म्हणजे होतेच. त्यातही एखादी एक्सप्रेस वेळेत आलीच, तर तो दिवस प्रवाशांसासाठी सोनियाचा दिवस म्हणावा लागेल. पण एखादी एक्सप्रेस चक्क वेळेच्या आधी तीही ५-१० मिनिटं नव्हे तर चक्क १३ मिनिटं आधी आली तर नक्कीच प्रवाशांना हर्षवायु होईल आणि हेच सोमवारी राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या बाबतीत झालं आहे. दिल्लीवरून मुंबईला मध्य रेल्वे मार्गावरून सुटलेली पहिली नवी कोरी एक्सप्रेस सोमवारी चक्क १३ मिनिटं लवकर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात दाखल झाली आहे.


नियोजित वेळेआधीच मुंबईत दाखल

मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्सप्रेस गाडी क्र. २२२२१ ही आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी सीएसएमटी ते निझामुद्दिन दुपारी २.५० वाजता सुटणार आहे. तसंच, दर गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. २२२२२ निझामुद्दिन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे. अशाप्रकारे या राजधानी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले होते. नियोजित वेळेनुसार एक्सप्रेस निझामुद्दिन स्थानकातून सुटली आणि सीएसएमटी स्थानकात नियोजीत वेळेच्या १३ मिनिटे आधीच म्हणजे सोमवारी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांना पोहोचली आहे. जेव्हा की, ही एक्सप्रेस ११ वाजून ५५ ला सीएसएमटीमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. पण राजधानी एक्सप्रेस १३ मिनिटं लवकरच आल्यानं प्रवाशी मात्र खुश होते.


नवी कोरी राजधानी एक्सप्रेस 

मुंबईकर प्रवाशांसह नाशिक-धुळे-जळगावकर प्रवाशांसाठी शनिवारी पहिल्यांदाच मध्य रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस नाशिकमार्गे दिल्लीच्या दिशेनं दुपारी पावणे तीनच्या सुमारास निघाली. पहिल्यांदाच नाशिकमार्गे राजधानी जाणार असल्यानं नाशिक-धुळे-जळगावमधील प्रवाशी खुश असतानाच नवी कोरी, नव्या सुविधांयुक्त राजधानी एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दरम्यान ही एक्सप्रेस नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिन (दिल्ली)ला जाणार आहे. तसंच, या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.हेही वाचा -

नवी कोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून रवाना

संपादरम्यान अर्धागवायूचा झटका आलेल्या बेस्ट चालकाचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या