Advertisement

नवी कोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून रवाना

मुंबईकर प्रवाशांसह नाशिक-धुळे-जळगावकर प्रवाशांसाठी शनिवारचा दिवस काही औरच आहे. कारण शनिवारी पहिल्यांदाच मध्य रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस नाशिकमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दुपारी पावणे तीनच्या सुमारास निघाली आहे.

नवी कोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून रवाना
SHARES

मुंबईकर प्रवाशांसह नाशिक-धुळे-जळगावकर प्रवाशांसाठी शनिवारचा दिवस काही औरच आहे. कारण शनिवारी पहिल्यांदाच मध्य रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस नाशिकमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दुपारी पावणे तीनच्या सुमारास निघाली आहे. पहिल्यांदाच नाशिकमार्गे राजधानी जाणार असल्यानं नाशिक-धुळे-जळगावमधील प्रवाशी खुश असतानाच नवी कोरी, नव्या सुविधांयुक्त राजधानी एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानं सर्वच प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे. हाच आनंद राजधानी एक्स्प्रेस दुपारी पावणे तीनच्या सुमारास सीएसएमटी स्थानकातून दिल्लीसाठी निघाली त्यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर होता.लोकार्पण सोहळा

पश्चिम रेल्वेवर राजधानी एक्सप्रेसच्या दोन गाड्या धावतात. त्यात आता आणखी एका नव्या कोऱ्या तिसऱ्या राजधानी एक्सप्रेसची भर पडली असून ही नवीकोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून आठवड्यात दोन दिवस मुंबईतून दिल्लीसाठी धावणार आहे. १९ जानेवारीला मुंबईवरून नाशिकमार्गे राजधानी एक्सप्रेस धावणार अशी घोषणा झाल्यापासूनच प्रवाशांमध्ये खास करून नाशिक-धुळे-जळगावमधील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यानुसार शनिवारी नवीकोरी राजधानी एक्सप्रेस फुलांनी आणि फुग्यांनी सजवण्यात आली होती. आकर्षक रंगसंगती असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सौंदर्यात फुलांनी आणि फुग्यांनी आणखी भर टाकली. सकाळपासूनच नव्या कोर्या राजधानी एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रेल्वेनं खास जय्यत तयारी केली होती. तर प्रवाशांमध्येही उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं.नव्या सुविधा

जसे प्रवाशी नव्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये शिरले तसा नव्या राजधानीचा नवा थाट पाहून भारावून गेले. अनेक नव्या सुविधा या राजधानी एक्सप्रेसमध्ये पुरवण्यात आल्या असून प्रवाशांनी रेल्वेचे आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान पावणे तीनच्या सुमारास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि राजधानी एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना दिली त्याबरोबर एकच टाळ्यांचा गजर झाला.
नाशिकमार्गे धावणार

मध्य रेल्वेची ही पहिली राजधानी एक्स्प्रेस आठवडयाच्या बुधवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथून दुपारी २.५० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी १०.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी एक्सप्रेस नाशिकमार्गे धावणार असून कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा देण्यात येणार आहेत. दरम्यान याआधी मुंबईतून सुटणाऱ्या दोन राजधानी गाडया पश्चिम रेल्वेच्या मार्गाने गुजरातमार्गे धावत होत्या.राजधानी एक्सप्रेसची वैशिष्ट्ये


  • नव्या राजधानी एक्सप्रेसला १५ बोगी असणार असून एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे.
  • फर्स्ट एसी - वाय फाय सुविधा देण्यात आली आहे.
  • पाण्याची बचत करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत.
  • प्रवासात गैर सोय होऊ नये यासाठी विशिष्ट पद्धतीचं शौचालय बसविण्यात आलं आहे.
  • फर्स्ट आणि सेकंड एसी मध्ये बटन दाबल्यानंतर प्रत्येकवेळी वेगळी रोल सीट बाहेर येणार आहे.
  • हात धुण्यासाठी ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सर बसविण्यात आले आहे.
  • प्रत्येक कोच मध्ये सुगधं दरवळत ठेवण्यासाठी fragence dispenser बसविण्यात आले आहेत.
  • प्रवासा दरम्यान प्रवाशांना चादरी, बेड, उशी आणि उशीची कव्हरं देण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • प्रवाशाना उन्हाचा त्रास होऊ नये आणि बाहेरील मनमोहक दृष्य न्याहाळता यावं यासाठी roller blind चा वापर करण्यात आलं आहे.
  • कोणीही घसरून पडून नये यासाठी duro wipe carpet बसविण्यात आले आहे.पाच तासात बुकींग फूल

दरम्यान राजधानी एक्सप्रेसच्या तिकीटांच्या बुकिंगला सुरवात झाली असता अवघ्या पाच तासांच सर्व तिकीट बूक झाल्याचे समजते आहे. तसंच, प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी विविध प्रकारच्या सुविधा या एक्सप्रेसमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

'रावा'स पुढे करून कामगारांस 'रंक' करण्याचा डाव-सामानातून शशांक राव-भाजपावर टीका

भूतबाधा काढण्याच्या नावाखाली लिंबू विक्रेत्यानं लुटलं घरंसंबंधित विषय