भूतबाधा काढण्याच्या नावाखाली लिंबू विक्रेत्याला मांत्रिकानं गंडवलं

मुंबईसारख्या शहरात आजारपणात डाॅक्टरकडे जाण्याएेवजी भोंदुबाबा-बुवा, मांत्रिकाकडे जाणार्या लोकांची कमी नाही याचं ताज उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. तर या भोंदुबाबा-बुवा,मांत्रिकाकडं जाणं कसं आणि किती महागात पडतं याचाही चांगलाच अनुभव कफ परेडमधील एका कुटुंबाला आला आहे.

भूतबाधा काढण्याच्या नावाखाली लिंबू विक्रेत्याला मांत्रिकानं गंडवलं
SHARES

मुंबईसारख्या शहरात आजारपणात डाॅक्टरकडे जाण्याएेवजी भोंदुबाबा-बुवा, मांत्रिकाकडे जाणाऱ्या लोकांची कमी नाही याचं ताज उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. तर या भोंदुबाबा-बुवा,मांत्रिकाकडं जाणं कसं आणि किती महागात पडतं याचाही चांगलाच अनुभव कफ परेडमधील एका लिंबू विक्री करणाऱ्या रामअवध जैसवाल आणि त्याच्या कुटुंबाला आला आहे. मुलगी आजारी पडल्यानंतर तिला डाॅक्टरकडे नेण्याएेवजी तिला भूतबाधा झाल्याच म्हणत एका मांत्रिकाकडे नेणाऱ्या या कुटुंबाला मांत्रिकानं चांगलाच गंडा घातला आहे. भूत उतरवण्याच्या नावाखाली या मांत्रिकांनं घर लुटुन हा मांत्रिक फरार झाला असून हे कुटुंबावर आता रडत बसण्याची वेळ आली आहे.


जैसवार कुटुंब असं पडलं बळी

कफपरेड येथील शिवशक्तीनगर इथं रामअवध जैसवार आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. मे २०१८ मध्ये जैसवार यांच्या मुलीला ताप आल्यानं त्यांची पत्नी मुलीला घेऊन येथील मच्छिमारनगरमधील डाॅ. सलाखा यांच्या दवाखान्यात घेऊन गेली. मात्र दवाखाना बंद असल्यानं जैसवारच्या पत्नीनं शेजारच्या एका इस्त्रीवाल्याकडे दवाखाना कधी उघडणार याची विचारणा केली. त्याचवेळी तिथं सूरज (वय वर्षे ३५) नावाचा एक व्यक्ती बसला होता आणि त्याने हे एेकलं आणि आपण आयुर्वेदिक उपचार करतो असं जैसवार यांच्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर सूरजने त्या मुलीला काळी मिरी खाण्यास दिली. त्यानंतर सूरजने जैसवारच्या पत्नीला सायंकाळी फोन करण्यास सांगितलं. सायंकाळी जैसवारच्या पत्नीनं सूरजला फोन केल्यानंतर सूरजने त्यांना मुलीला भूतबाधा झाल्याचं सांगितलं. तर आठ दिवसांत भूत उतरवलं नाही तर ती दगावेल असंही सांगितलं. त्याबरोबर जैसवार कुटुंब घाबरलं आणि त्यांनी सूरजची भेट घेतली. त्यानंतर सूरजला घरी बोलावलं. सूरजने जैसवार यांना एक मडकं आणण्यास सांगितलं होतं.


सोनं आणि रोख रक्कम पळवली

त्यानुसार २० मे २०१८ ला सूरज जैसवार यांच्या घरी आला. त्यावेळीही सूरजने जैसवारच्या मुलीला आणि पत्नीला काळी मिरी खाण्यास दिली. त्यानंतर मडक्यात मंत्र म्हणून त्यांने त्याच्याजवळील काही वस्तू टाकून मडक्याचं तोंड बांधून ठेवलं. पुढे जैसवारला लिंबू आणि कोळसा आणायला लावला. जैसवार घरात परत यायच्या आधीच सूरजने जैसवारच्या पत्नीला आणि मुलीला गॅलरीत पाठवून कपाटातून सोनं आणि रोख रक्कम घेत बाथमरूमला जाण्याच्या नावाखाली पळ काढला.


गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर जैसवार यांनी सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही सूरजचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे अखेर जैसवार यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी तपास कर १२ जानेवारी २०१९ ला याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिस आता सूरजचा शोध घेत आहेत.



हेही वाचा -

मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दाखवला हिरवा कंदील

200 हून अधिक नागरीकांची फसवणूक करणारे पोस्ट एजंट अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा