Advertisement

गोवंडीत वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रियेविनाच


गोवंडीत वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रियेविनाच
SHARES

शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात येणारे सलाईन, इंजेक्शनच्या सिरिज, आदी वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रियेविनाच लावली जात असल्याने गोवंडी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला आहे. तसेच प्रक्रियेविना विल्हेवाट लावण्यात येत असल्याने परिसरातील रहिवाशांना दम्यासारखे आजार होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यामुळे वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारी आयएनओ क्लिन प्रायव्हेट एसएमएस कंपनी लवकरात लवकर बंद करावी, अशी मागणी देखील नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केली आहे.

मुंबई पालिका रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट आयएनओ क्लिन प्रायव्हेट एसएमएस कंपनीला 2008 पासून देण्यात आले आहे. या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे आवश्यक असतानाही, ती योग्य रितीने होत नसल्याचा आरोप देखील लोकरें यांनी केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा