Advertisement

ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक की गुड न्यूज? १ एप्रिलपासूनचे नवे दर जाणून घ्या

१ एप्रिल २०२१ पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीनं (MERC) घेतला आहे.

ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक की गुड न्यूज? १ एप्रिलपासूनचे नवे दर जाणून घ्या
SHARES

१ एप्रिल २०२१ पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीनं (MERC) घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिलेत.

याबाबत एमईआरसीनं दिलेल्या माहितीनुसार, या एफएसीच्या माध्यमातून मार्च २०२० मध्ये जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर यावर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महावितरण : निवासी वापरासाठी एप्रिलपासून १ टक्के तर अनिवासी वापरासाठी जसं की कंपनी, इंडस्ट्री यांना २-५ टक्के कपात. महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे ७.५८ रूपये मोजावे लागतील.

बेस्ट : निवासी वापरासाठी १ एप्रिलपासून ०.१ टक्के तर अनिवासी वापरासाठी जसं की, कंपनी, इंडस्ट्री यांना ०.३-२.७ टक्के कपात. त्यामुळे बेस्टच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ६.४२ रूपये मोजावे लागतील.

अदानी : निवासी वापरासाठी १ एप्रिलपासून ०.३ टक्के तर अनिवासी पावरासाठी जसं की, कंपनी, इंडस्ट्री यांना १.४-१.६ टक्के कपात. त्यामुळे अदाणीच्या ग्राहकांना आता ६.५३ रूपये प्रत्येक युनिटसाठी मोजावे लागतील.

टाटा : निवासी वापरासाठी एप्रिलपासून ४.३ टक्के तर अनिवासी वापरासाठी जसं की, कंपनी, इंडस्ट्री यांना १.१-५.८ टक्के दर वाढ. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ५.२२ रूपये मोजावे लागतील.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा