Advertisement

यंदा सरासरी इतका पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबईसह राज्यभरातील नागरिक उकाड्यानं हैराण झाले असून, हवामान खात्यानं आनंदाची बातमी दिली आहे.

यंदा सरासरी इतका पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिक उकाड्यानं हैराण झाले असून, हवामान खात्यानं आनंदाची बातमी दिली आहे. यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी आहे. गतवर्षी पावसानं उशिरा हजेरी लावली होती. परंतु, यंदा जुनच्या पहिल्याच्या पंधरवड्यातच पाऊस हजेरी लावणार आहे.

५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. यंदा निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.

यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होणार आहे. या कालावधीत अल निनोमुळं होणारा परिणाम सामान्य असणार आहे. पावसाच्या ४ ही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळं पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.

भारतीय हवामान खात्यासोबतच बहुतांश इतर संस्थांनीदेखील यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पॅसिफिक महासागरातील ला निनोचा प्रभाव कमी होईल, अशी शक्यता जगातल्या काही संस्थांनी वर्तवली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली.

समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचा भारतातल्या मान्सूनवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानावर हवामान विभागानं लक्ष ठेवून असल्याची माहितीही हवामान खात्यानं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा