Advertisement

म्हाडाच्या ८२०५ घरांसाठी १४ ऑक्टोबरला सोडत

या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे असतील.

म्हाडाच्या ८२०५ घरांसाठी १४ ऑक्टोबरला सोडत
SHARES

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून ८ हजार २०५ घरांसाठी १४ ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीची जाहिरात २३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.  गुरूवारी पत्रकार परिषदेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.

या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे असतील. संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत केली असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

या योजनेतून ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड येथे तर पालघर जिल्ह्यातील विरार, बोळींज तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठी अर्जाची किंमत ५६० रुपये असेल. अर्जासोबत अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार, तर उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार इतकी असणार आहे. 

मासिक उत्पन्न मर्यादा अत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त अशी असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा