Advertisement

तर, मंत्रालयापुढं फुकट दूध वाटप

३ मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाची राज्य सरकारने अद्याप दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची उपेक्षा न थांबल्यास थेट मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तर, मंत्रालयापुढं फुकट दूध वाटप
SHARES

राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशानुसार दूधाला प्रति लिटर २७ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून 'लुटता कशाला फुटकच न्या' असं म्हणत राज्यभर आंदोलन छेडलं आहे. ३ मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाची राज्य सरकारने अद्याप दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची उपेक्षा न थांबल्यास थेट मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


तळतळाट सरकारपर्यंत पोहोचवा

राज्यातील सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आंदोलन होऊनही सरकारने दूध उत्पादकांची उपेक्षा केल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवसापासून दूध उत्पादक शेतकरी तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आमचा तळतळाट सरकारपर्यंत पोहोचवा’ म्हणत फुकट दूध वाटप करणार आहेत.



भाजपाचे आमदार, मंत्री दूध पिणार

एवढंच नाही, तर भाजपाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आमंत्रण देऊन तहसील कार्यालयांवर दूध पिण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरावर या काळात ठिकठीकाणी रास्तारोको आंदोलने करण्यात येणार आहेत. इतके करूनही आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई मंत्रालयासमोर धडक देत मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.


मंत्रालयासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड आणि नाशिक जिल्ह्यात संघर्ष समितीचा व्यापक दौरा आयोजित करण्यात आहे. राज्यभरातील दूध उत्पादक व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क करून या आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे.
- डाॅ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा


काय आहेत मागण्या?

  • इतर राज्यांच्या धर्तीवर दूध उत्पादकांना थेट अनुदान
  • जाहीर दर व प्रत्यक्ष दरातील अंतर भरून काढा
  • दूध पावडरच्या निर्यातीसाठी अनुदान द्या
  • शालेय पोषण आहारात दूधाचा समावेश करा
  • दूध धोरणाचा स्वीकार करा



हेही वाचा-

'ते' रोखणार मुंबई, ठाण्याचं दूध!

दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं 'फुकट' आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा