Advertisement

दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं 'फुकट' आंदोलन

शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 'लुटता कशाला फुकट घ्या' असं म्हणत फुकट दूध वाटप आंदोलन दूध उत्पादक जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू केलं आहे.

दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं 'फुकट' आंदोलन
SHARES

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार दुधाला 27 रुपये हमीभाव असतानाही दूध महासंघांकडून केवळ 17 रुपये हमीभाव दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 'लुटता कशाला? फुकट घ्या' असं म्हणत फुकट दूध वाटप आंदोलन दूध उत्पादक जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू केलं आहे.

तर 9 मे पर्यंत 27 रुपये हमीभाव दुधाला मिळाला नाही तर मुंबई आणि ठाण्यासह इतर मोठ्या शहरांचा दूध पुरवठा बंद करण्याचा इशाराही राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात दूधटंचाई निर्माण होण्याची भीती आहे.


सरकारनं घेतली दखल 

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या फुकट दूध वाटप आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी खासगी आणि सरकारी सर्वच दूध महासंघांना नोटीस बजावत 27 रुपये हमीभाव देण्याचे आदेश दिले आहेत. तर 'जे महासंघ या आदेशाचं पालन करणार नाही, त्यांच्याविरोधात शुक्रवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं'ही जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.


'आमचा यावर विश्वास नाही'

'जानकरांच्या या आश्वासनावर आपला विश्वास नाही' असं म्हणत फुकट दूध वाटप आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीचे पदाधिकारी डॉ. अजित नवले यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. 'तर दूध घालायला गेलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हातात 27 रुपये दराची पावती पडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल' असंही नवले यांनी स्पष्ट केलं आहे.


शेतकऱ्यांनी छेडलं आंदोलन

जून 2017 ला दुधाला 27 रुपये हमीभाव देण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं जारी केला आहे. पण 11 महिने झाले तरी या अध्यादेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत अडकले आहेत. त्यामुळेच आता आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलं आहे.


तोपर्यंत आंदोलन सुरू राहिलं'

'मंत्र्यांकडून वेळोवेळी नोटीसा पाठवत कारवाई करण्याचे आदेश दिले जात आहेत, पण प्रत्यक्षात काही 27 रुपये हमीभाव मिळताना दिसत नाही की हमीभाव न देणाऱ्या महासंघांवर कारवाईही होताना दिसत नाही. त्यामुळे आता जरी मंत्र्यांनी नोटीसा पाठवल्याचं आणि कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी जोपर्यंत शेतकऱ्यच्या हातात 27 रुपयांची पावती पडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिलं', असं सांगत नवले यांनी सरकारला पुन्हा आव्हान दिलं आहे.

सरकारच्या आश्वासनानंतरही दुधाचा प्रश्न सुटणार नसल्यानं आता दूध प्रश्न चिघळतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 9 मे नंतर नेमकं काय होतं, मुंबई-ठाण्याचा दूध पुरवठा बंद केला जातो का? याकडेही सर्वांच लक्ष लागलं आहे.


हेही वाचा - 

'ते' रोखणार मुंबई, ठाण्याचं दूध!

दूधात भेसळ करणाऱ्यांना आता जन्मठेपेची शिक्षा, नवा कायदा करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा