SHARE

राज्य सरकारने रविवारी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यासह आता सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या दोन दिवसात दुधाचे दर वाढवण्याचीही घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. सरकार येत्या एक ते दोन दिवसात दुधाची किंमत वाढवण्याची घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

सध्या गायीच्या दुधाची किंमत 24 रुपये प्रती लिटर आहे. आता त्यात वाढ होऊन 27 रुपये प्रती लीटर होणार आहे. म्हशीच्या दुधाची किंमत सध्या 33 रुपये आहे. त्यात वाढ होऊन ती 37 रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनामुळे सरकारची कोंडी झाली होती. पण सरकारने अखेर रविवारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या